¡Sorpréndeme!

Pune रेल्वे पोलिसांच्या ताब्यातील तरुणाच्या मृत्यूचं प्रकरण रोहित पवारांनी विधानसभेत मांडलं | Sakal

2022-08-24 348 Dailymotion

चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपी नागेश रामदास पवार (वय २९ वर्षे) याचा पुणे रेल्वे पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. १६ ऑगस्ट रोजी पुणे रेल्वे पोलिसांनी मयत तरुणाला चोरीच्या संशयावरून अटक केली होती. याप्रकरणी पुणे स्टेशनवर पकडलेल्या तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केला. विधानसभेत 'पॉईंट ऑफ इन्फर्मेशन'खाली रोहित पवारांनी या गंभीर घटनेकडं सरकारचं लक्ष वेधून घेतलं आणि दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची, मयत तरुणाच्या कुटुंबाला मदत करण्याची मागणीही रोहित पवारांनी केली